माहिती कार्यालयाचे निवृत्त कर्मचारी सज्जन रणदिवे यांचे निधन

सिंधुदुर्गनगरी, दि. ११-:* जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रदीर्घ सेवा बजावलेले निवृत्त कर्मचारी सज्ज्न विठ्ठल रणदिवे (७४) यांचे शुक्रवारी पहाटे ओरोस येथे निधन झाले. ‘रणदिवे मामा’ या नावाने जिल्हा मुख्यालय आणि कर्मचारी कॉलनीमध्ये ते ओळखले जायचे. त्यांचा जनसंपर्क अफाट होता. हसतमुख चेहरा, मधुर वाणी आणि सर्वांशी मिळुन मिसळुन वागण्याचा स्वभाव यामुळे केवळ कार्यालयातच नव्हे तर मुख्यालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्यामध्ये ते लोकप्रिय होते.

त्यांच्या मागे पत्नी मालन, मुलगे सचिन व अशोक, सुना, नातवंडे आणि मोठा मित्रपरिवार आहे. ओरोस खुर्द येथील त्यांच्या निवासस्थानी निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत, निवृत्त नगररचनाकार पी. एल. कदम, माहिती कार्यालर्याचे निवृत्त कर्मचारी चंद्रकांत कारिवडेकर यांच्यासह अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. फलटण (सातारा) येथे त्यांच्या मूळ गावी त्यांच्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page