कर्नाटकातील पर्यटकांची कार पुलात कोसळली

मूळवंदवाडी येथील रात्री ३ ची घटना तिघे जखमी

आंबोली, ता.११-: येथील मुळवंद वाडी येथील पूलात अंदाज चुकल्याने रात्री ३ च्या दरम्यान कर्नाटक येथील पर्यटकांची कार पुलात कोसळली यात तिघे जण जखमी झाले.

त्यांना येथील रमेश तावडे व येथून जाणाऱ्या एका गाडीतील लोक थांबवून व शिवसेनेचे उपविभाग प्रमुख उत्तम पारधी यांनी मदत केली.यानंतर १०८ रुग्णवाहिका बोलावून आंबोली आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.बेळगाव येथून गोव्याकडे जात असताना रात्री अपघात घडला मात्र जखमींची नावे समजू शकली नाही.

You cannot copy content of this page