देवगड ता.१०-:* तालुक्यातील फणसे समुद्रकिनारी ४५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत ९मार्च २०२२ रोजी रात्री ९.३१ च्या सुमारास आढळून आला असून त्यानुसार संदर्भात महेश शरदचंद्र मांजरेकर यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फणसे येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष दिनेश गावकर हे फणसे समुद्रकिनारी मासेमारी करीता गेले असता वरील अनोळखी इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसून आले.त्या बाबत देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
