पहिल्यांदा पक्षाचे तिकीट मिळवून दाखवा त्यानंतर आमच्यावर टीका करा; सावली पाटकर यांचा बंटी पुरोहित यांच्यावर पलटवार
सावंतवाडी ता.१०-:* नगराध्यक्षाची तळी सांभाळणाऱ्यानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना राजकारण शिकवू नये, अशी जोरदार टीका जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस सावली पाटकर यांनी भाजपच्या बंटी पुरोहित यांना लगावला आहे.यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वाढत असून, आपला प्रतिस्पर्धी आहे असे खुद्द माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत घेत मान्य केल्याचे कदाचित बंटी पुरोहित विसरले असतील असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
यावेळी त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, बंटी पुरोहित यांनी पहिल्यांदा पक्षाचे तिकीट मिळवून दाखवावे, त्यांनी आमच्या उमेदवारांची काळजी करू नये असा सल्ला देखील त्यांना दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सुसंस्कृत नगरसेवक उभे करणार असून, त्याची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
