आगामी निवडणुकीत विरोधकाना हवा का झोका दाखवून देऊ….

माजी नगराध्यक्ष संजू परब; चार विधानसभेतील विजयाचा सावंतवाडीत लाडू वाटून जल्लोष…

सावंतवाडी ता.१०-:* भारतातील आज पाच विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भाजपने चार राज्यात निर्विवाद वर्चस्व गाजवत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांकडून विज्योत्सव साजरा करण्यात आला असून, यावेळी भाजपकडून लाडू वाटून जल्लोष साजरा केला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब बोलताना म्हणाले की, आगामी निवडणुकीत सावंतवाडीत भाजपचीच सत्ता येणार असून, कोणीही कितीही प्रयत्न केले तरी भाजपचीच सत्ता येणार आहे. हवा का झोका काय असतो ते आगामी निवडणुकीत विरोधकांना दाखवून देवू तसेच कोणाची किती पात्रता आहे ते येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल अशी जोरदार टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक आनंद नेवगी, भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर सुकन्या टोपले,बेला पिंटो,पिंट्या सावंत, परीक्षेत मांजरेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page