दोडामार्ग भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट…

सावंतवाडी ता.१०-:* आगामी काळात सावंतवाडी नगरपालिकेची निवडणुक होणार असून, आज सावंतवाडी नगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दोडामार्ग तालुक्यातील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांनी निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष संजू परब यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या वेळी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणुकीत संजू परब यांनी किंगमेकरची भूमिका बजावत सावंतवाडी नगरपालिकेवर सत्ता स्थापन केली होती. यावेळी देखील त्यानी किंगमेकर ची भूमिका बजावत पुन्हा एकदा भाजपची सत्ता सावंतवाडी नगरपालिकेवर आणावी अशा शुभेच्छा त्यानी यावेळी दिल्या आहेत.

You cannot copy content of this page