भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बंटी पुरोहित यांचा खोचक सवाल….
सावंतवाडी ता.१०-:* राष्ट्रवादी काँग्रेसला सावंतवाडी नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी २० उमेदवार शोधून तरी सापडतील का? असा सवाल भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बंटी पुरोहित यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल असे सांगून सावंतवाडीतील जनतेची राष्ट्रवादी काँग्रेसने दिशाभूल करू नये. वरिष्ठांनी आदेश दिल्यावर राष्ट्रवादीला महाविकास आघाडी करावीच लागेल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी स्वबळाची भाषा करू नये. राष्ट्रवादी काँग्रेसकडे २० जागा लढविण्यासाठी उमेदवार देखील नाहीत. असे जोरदार प्रतिउत्तर बंटी पुरोहित यांनी अर्चना घारे परब यांना दिले आहे.
