राष्ट्रवादी काँग्रेस कडून शहरात मोफत ई श्रम कार्ड आणि मोफत युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन…

राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे – परब यांची माहिती …

सावंतवाडी ता.१०-:* शहरात राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे – परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी मोफत ई श्रम कार्ड आणि मोफत युनिव्हर्सल पास अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी येत्या १० दिवसात याबाबतचे पत्रक संपूर्ण सावंतवाडीत घराघरात वाटली जाणार असून, यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस घरा घरात पोचविण्याचा आमचा मानस असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. हे शिबिर शहरातील उभाबाजार येथील श्रद्धा सदन येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात दिनांक १९ मार्च ते २७ मार्च या कालखंडात सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत आयोजित करण्यात आला आहे. या शिबिराचा सावंतवाडीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहरअध्यक्ष देवेंद्र टेमकर, सावली पाटकर, संतोष जोईल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page