कोहिनूर परमिट रूमचे मालक उत्तम धुमाळे यांचे निधन

*⚡कणकवली ता.१०-:* कणकवली तालुक्यातील कलमठ नाडकर्णीनगर येथील रहिवासी कोहिनूर परमिट रूमचे मालक उत्तम धुमाळे (55)यांचे अल्पशा आजराने गुरुवारी पहाटे निधन झाले. बुधवारी रात्री त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. मनमिळावू व हसमुख स्वभावाने ते परिचित होते.

कणकवली तालुका परमिट व परवाना धारक अध्यक्ष म्हणून ते काम करत होते.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ भावजय असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page