आंबेडकरनगर विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न-अंकुश जाधव

वेंगुर्ला ता.१०-:* आडेली-आंबेडकरनगर या वाडीच्या विकासासाठी शासन दरबारी लागेल0 ती मदत तसेच अपूर्ण राहिलेली कामे यांचा त्वरित पाठपुरावा करून ती काम पूर्ण करण्याचे आश्वासन समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी आडेली येथे दिले. यावेळी येथील नादुरुस्त असलेले समाजमंदिर, तसेच आडेली आंबेडकरनगर ते स्मशानभूमी रस्त्याच्या उर्वरित काम पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्यात येईल,असेही सांगितले.

आडेली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथील बौद्ध वस्ती सुधारणा अंतर्गत शासनाच्या निधीतून २०१९-२२ या वर्षाकरिता जो निधी मंजूर झाला, त्या निधीतून आंबेडकरनगर रहिवासी यांना वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यात आली. आडेली ग्रामपंचायतच्यावतीने दलित वस्ती सुधारणा अंतर्गत मंजूर निधीतून घर तेथे नळ कनेक्शन या योजनेतून ४३ नळकनेक्शन देण्यात आली. या नळकनेक्शनचे लोकार्पण समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच प्राजक्ता मुंडये, सोमेश्वर सोसायटीचे चेअरमन समिर कुडाळकर, पाणीपुरवठा शाखा अभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, ग्रा.पं.सदस्य विष्णू कोंडसकर, कृषी सहाय्यक लाडू जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजू सामंत, ग्रामविकास अधिकारी अनिल चव्हाण, उत्कर्ष कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष उदय आडेलकर, उपाध्यक्ष किशोर आडेलकर, प्रशांत मुंडये, यशवंत परब, बाबा घोंगे, बाबा टेमकर, फक्री आडेलकर, स्वप्नील धर्णे, तानाजी आडेलकर, स्वप्निल आडेलकर, रामदास आडेलकर, बाबुराव आडेलकर, संतोष आडेलकर, गोविंद आडेलकर आदी यावेळी उपस्थित होते. नळयोजना राबविलेल्या विहीरीसाठी लागणारी दोन गुंठे जमीन ही माजी पोलिसपाटील पांडुरंग राजाराम आडेलकर यांनी विनामोबदला ग्रामपंचायतच्या नावावर केल्याबद्दल अंकुश जाधव यांच्या हस्ते श्री. आडेलकर यांचा तसेच समिर कुडाळकर व स्वप्निल धर्णे यांचाही सत्कार करण्यात आला. रमेश आडेलकर यांनी मान्यवरांचे स्वागत तर उदय आडेलकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

You cannot copy content of this page