वेंगुर्ला ता.१०-:* वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाच्यावतीने रविवार दि.१३ मार्च रोजी सकाळी १०.३० वा. साई डिलक्स हॉल, सुंदरभाटले, वेंगुर्ला येथे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर, अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपआयुक्त रामदास कोकरे, पं. स.सभापती अनुश्री कांबळी, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, सिधुदुर्ग दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व उद्योजक विलास गावडे आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात भरत सातोस्कर (तरुण भारत), विनायक वारंग (सामना), मॅक्सी कार्डोज (पुढारी), सीमा मराठे (किरात) यांना वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाच्यावतीने जाहिर झालेल्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहेत. ‘स्वच्छता ही सेवा‘ हे ब्रिद जनमानसात बिबऊन वेंगुर्ला न.प.ला करोडोंची बक्षिसे मिळवून देणारे आणि कचरा मुक्त डंपिग ग्राऊंडचे जनक रामदास कोकरे तसेच कुडाळ पत्रकार समितीचा व्याधकार ग.म.तथा भैय्यासाहेब वालावलकर जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त के.जी.गावडे, जिल्हा पत्रकार संघाचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त आपा परब तर मदत सामाजिक संस्था नागपूर यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२१ प्राप्त दिपेश परब यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर पत्रकार संघातर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचाही गौरव याच कार्यक्रमात होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत व सचिव अजित राऊळ यांनी समितीच्यावतीने केले आहे.
