कणकवली ता.१०-:* युवा कार्यक्रम आणि क्रीडा, भारत सरकार व राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन कार्यक्रम महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
एक सभ्य, सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी महिला सुशिक्षीत व सुसंस्कृत असणे आवश्यक आहे म्हणुन मुलींचे शिक्षण त्यांना आत्मनिर्भर बनविण्याकरता आणि त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्याकरता आवश्यक आहे. असे देखील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी प्रतिनिधी कु.अंकिता सुर्वे व कु.सिध्देश सावंत, कु.नीलम पांचाळ आदी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सक्रीय सहभाग दर्शविला. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष कार्यक्रम अधिकारी तथा सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री.वसीम सय्यद, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग विस्तार अधिकारी प्रा.गजानन व्हंकळी, डब्ल्यू.डी.सी. समिती प्रमुख प्रा.रोहिणी मर्ये, कला शाखा प्रमुख प्रा.प्रकाश शिंदे, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा.महंमदअली मुन्शी व विज्ञान शाखा प्रमुख प्रा.सागर इंदप आदी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.वसीम सय्यद, पाहूण्यांची ओळख प्रा.रश्मी देसाई व आभार प्रदर्शन कु.सिध्देश सावंत यांनी केले.
