राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयुष राठोडचे सुयश

सावंतवाडी ता.१०-:* संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या मार्फत आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये वय वर्ष 15 या गटामध्ये मुक्ताई अकॅडेमी सावंतवाडीचा खेळाडू आयुष विजय राठोड याने चौथा क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेमध्ये राज्यभरातून 200 खेळाडू सहभागी झाले होते.

या यशामध्ये मुक्ताई अकॅडमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर यांचे विशेष मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे सर यांचेही मार्गदर्शन लाभले. आयुषच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे हार्दिक अभिनंदन होत आहे. आयुष हा श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील प्रा.विजय राठोड यांचा मुलगा आहे.

You cannot copy content of this page