योगशिक्षका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांनी घेतली योगगुरु बाबा रामदेव यांची सदिच्छा भेट

कणकवली ता.०९-:* पतंजली योगपीठचे सर्वेसर्वा योगगुरु बाबा रामदेव रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांची कणकवली येथील राष्ट्रीय योग पदवीप्राप्त योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांनी सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी सौ.गावडे यांनी बाबा रामदेव यांचे देवगड हापुस आंबापेटी भेट देऊन स्वागत केले.

बाबा रामदेव यांनी सौ.गावडे करत असलेल्या ऑनलाइन व ऑफलाईन योग प्रसार आणि प्रचार कार्याची माहिती घेऊन त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी सौ.गावडे यांनी बाबा रामदेव यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन योग मार्गदर्शन करण्याचे आमंत्रण दिले.

You cannot copy content of this page