होळी रंगपंचमी निमित्त होणाऱ्या गैर प्रकारांना आळा घालण्याची मागणी

*⚡मालवण ता.०९-:* होळी व रंगपंचमी सणाच्या निमित्ताने होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालवण पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. अलीकडच्या काळात होळी सणाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.

होळी सणाला धिंगाणा घालणे, काळे फासणे तसेच रंगपंचमी सणाला घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे, स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, अश्लील अंगविक्षेप करणे, आरोग्याला घातक रंग वापरणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने रंग खेळणे, पादचारी व स्त्रियांवर पाण्याचे फुगे मारणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व धूम्रपान करणे अशा व इतर गैरप्रकारांना प्रशासनाने व पोलिसांनी प्रतिबंध करावा, महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करावे, यात हिंदू जनजागृती समिती सहकार्य करेल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी समितीचे कार्यकर्ते सुहास दुदवडकर, शिवाजी देसाई, मधुसुदन सारंग, तसेच अशोक ओटवणेकर, राजेश वळंजू, चेतन सकपाळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page