मालवण ता.०९-:* श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्यूकेशनल फाऊंडेशन संचालित डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल आणि प्राथमिक शाळा, मालवण येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी हडीचे सरपंच व संस्थेचे संचालक महेश मांजरेकर याने मार्गदर्शन करून महिलांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुडाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. साटलकर, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ. प्राची परब, शिक्षिका सौ. शिंदे, सौ. साटम, सौ. गावकर यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्यूकेशनल फाऊंडेशन संस्थेचे सचिव आणि व्यवस्थापन समिती अध्यक्ष भालचंद्र राऊत, संस्थेचे संचालक आणि हडी ग्रामपंचायतीचे सरपंच महेश मांजरेकर, खजिनदार विनायक निवेकर सौ. अमिता निवेकर, श्री. आचार्य, श्री. शिंदे, श्री. आठलेकर आदी उपस्थित होते.
