महान येथील पाककला स्पर्धेत मयुरी शिंदे प्रथम

मालवण ता.०९-:* जागतिक महिला दिनानिमित्त महान येथील पुर्ण प्राथमिक शाळेत महीलासाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत सौ.मयुरी महेश शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत रवा पदार्थापासुन बनविलेली पाककृती विशेष आर्कषणाचा भाग ठरला.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम सौ.मयुरी महेश शिंदे (रवा गुलाब जाम), द्वितीय सौ.सुहानी सुहास साळुंखे(रवा बर्फी),तृतीत सौ.निता निलेश चव्हाण ( लवंग लतिका). यावेळी सरपंच-महानकर मॅडम, उपसरपंच,-सुहास साळुंखे, केंद्र प्रमुख शेख सर, मदन घाडी (शिक्षण तज्ञ,शाळाव्यवस्थापन समिती),सर्व पालक,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तोरसकर मॅडम, मुख्याध्यापक पेडणेकर मॅडम, प्रभू मॅडम, सोनू शिंदे, प्रियांका गावडे आदी उपस्थित होते. यांचे प्रमुख श्रेय सौ.निता निलेश चव्हाण व टीमला व महान गावातील समस्त महीलांना जाते. यासर्वांना विशेष मार्गदर्शन महान गावचे उपसरपंच श्री.सुहास साळुंखे यांनी केले.

You cannot copy content of this page