काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांची राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी तालुक्यासह शहरातील रुग्णास सेवेकडे लक्ष देण्याची विनंती आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे याबाबतचे लेखी निवेदन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी राज्याचे ग्रह गृहनिर्माण परिवहन राज्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे केली आहे याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यमंत्री पाटील यांनी तालुकाध्यक्ष सांगेलकर यांना दिले.
आजही आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना गोवा राज्यातील बांबुळी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो याशिवाय कोल्हापूर आणि बेळगाव कर्नाटक येथील रुग्णालयामध्ये रुग्णांना हलवावे लागत आहे त्यामुळे सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणजे रुग्णांची परवड संपेल अशी विनंती तालुकाध्यक्ष सांगोलकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.त्यांनी आज 10 मार्चला काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले
या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयाचे केंद्र मानले जाते. याठिकाणी खेडयापाडयातून सर्वसामान्य नागरिक, विविध आजारांवरती उपचार घेण्याकरिता अनेक वर्षे सावंतवाडीमध्ये ये-जा करीत असतात. याठिकाणी सोनोग्राफी मशिन उपलब्ध आहे, परंतु टेक्निशियन व तंत्रज्ञ उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरची औषधे जादा दराने खरेदी करावी लागतात. तसेच याठिकाणी रेडिओलॉजिस्ट व टेक्निशियन ही पदे तात्काळ भरावीत. याठिकाणी सिटीस्कॅन मशिन उपलब्ध व्हाव्यात जेणेकरुन 30 ते 40 कि.मी.च्या अंतरावर जर अपघात झाला किंवा डोक्याला कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास विलाविलंब याठिकाणी तात्काळ उपचार होऊ शकतील. याठिकाणी 8000 विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. याठिकाणी स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, हृदयरोग तज्ञ डॉ. अभिजित चितारी व डॉ.वजराटकर इ. डॉक्टर्स सर्वसामान्य नागरिकांना दिवसरात्र चांगली सेवा देतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे आशेचा किरण वाटत असल्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला शासन स्तरावरती विशेष दर्जा देवून जास्तीत जास्त दर्जेदार सोयीसुविधा आपल्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याची विनंती सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.
दरम्यान याप्रकरणी आपण गांभीर्याने लक्ष घालून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला अधिकची रुग्णसेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ही राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले
