मालवण रोटरी क्लब आणि PAL ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने भटक्या कुत्र्यांचे करणार निर्बीजीकरण…

गुरुवारी १० मार्च ला राबवणार मोहीम

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याने रोटरी क्लब मालवण आणि PAL ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने व मालवण नगरपालिका यांच्या सहकार्याने गुरूवारी १० मार्च रोजी शहरात भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अँटीरेबीज लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.

श्वानदंशापासुन धोका होऊ नये हा या मोहीमेचा उद्देश आहे. भटक्या कुत्र्याने दंश केल्यानतंर रेबीज होण्याची भीती मनात निर्माण होते. हे लक्षात घेऊन मालवणमधील भटक्या कुत्र्यांना अँटीरेबीज लस देण्याचे कार्य हाती घेण्यात येत असल्याची माहिती रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page