हाक मारताच ‘तुतारी’साठी आले मदतीचे हात

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मानले दात्यांचे आभार : कर्तव्य पूर्ततेच्या भावनेतून उभी केली तुतारी

सावंतवाडी ता.०५-:* मी हाक दिल्यानंतर मदतीसाठी असंख्य हात पुढे आले त्यातूनच तुतारी साठी लागणारा निधी जमा झाला यामुळे ही तुतारी याठिकाणी प्रस्थापित झाली. यामुळे ज्या ज्या व्यक्तींनी यासाठी मदत केली त्या सर्वांचे आभार मानतो असे गौरवद्वार आभार प्रदर्शन यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. कर्तव्याच्या पूर्ततेच्या भावनेतून ही तुतारी उभी केली असेही ते म्हणाले

साळगावकर पुढे बोलताना म्हणाले मी एका साध अर्ज करून तुतारी पुन्हा उभी करण्यासाठी परवानगी मागितली यावेळी अवघ्या दहा दिवसातच परवानगी मिळाल्याने नगरपालिकेचे देखील आभार त्यांनी मानले.

You cannot copy content of this page