कणकवली ता.०६-:* माजी प्राचार्य आर.व्ही नारकर व प्रयोग परिचर सहदेव गोसावी यांचे कासार्डे माध्यमिक विद्यालयासाठी मिळालेले योगदान संस्था,शाळा कधीच विसरू शकत नाही असे असे गौरवोद्गार कासार्डे विकास मंडळ मुंबई, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांना काढले.
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातीचे सेवानिवृत्त प्राचार्य आर.व्ही.नारकर व प्रयोग परिचारक सहदेव गोसावी यांच्या सेवानिवृत्तपर सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य एम.डी. खाड्ये,शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, संस्था पदाधिकारी आनंद कासार्डेकर,रविंद्र पाताडे, संजय पाताडे,दीपक गायकवाड, सत्कारमूर्ती आर.व्ही.नारकर,सहदेव गोसावी, पर्यवेक्षक नारायण कुचेकर,मारूती वळंजू, सौ.रंजना नारकर,तसेच सौ.गोसावी व शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन व शब्द सुमनाने स्वागत करीत सेवानिवृत्त प्राचार्य श्री.राजेंद्र नारकर व प्रयोग परिचर सहदेव गोसावी यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान संस्था पदाधिकारी आनंद कासार्डेकर,विद्यालयाचे पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर, शिक्षक सौ.रजनी कासार्डेकर, पांडुरंग काळे, दत्तात्रय मारकड,सौ.सुनिता कांबळे,सौ.सविता पाटील, प्रियंका नागावकर यांनी तर विद्यार्थ्यांतर्फे युवराज राठोड,कु.शिल्पा शेगावे,कु.सानिका कुलकर्णी,कु.दिव्यानी लाड, कु.प्रितिका चौगुले आदी विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र नारकर व प्रयोग परिचर सहदेव गोसावी यांच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकत त्यांच्या अनेक आठवणी जागृत केल्या व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामचंद्र राऊळ यांनी तर आभार सौ.भाग्यश्री बिसुरे यांनी मानले.
