मालवण (प्रतिनिधी) आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आचरा या संस्थेच्या सन २०२१ – २२ ते सन २०२६-२७ या कालावधीकरिता झालेल्या बिनविरोध निवडणुकीमध्ये संस्थेच्या चेअरमनपदी श्रीकांत रघुनाथ सांबारी, तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश राजाराम हडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चेअरमन निवडीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अध्यासी अधिकारी अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले यावेळी संस्थेचे संचालक राजन पांगे, लक्ष्मण आचरेकर वामन आचरेकर, संदीप पारकर, मंदार सांबारी, प्रमोद कोऴंबकर, दिलीप कावले संतोष गावकर, सरिता परब, हेमांगी खोत ,मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत राणे आदी उपस्थित होते. श्रीकांत सांबारी हे पतसंस्थेच्या स्थापनेपासूनच पतसंस्थेच्या चेअरमन पदाची धुरा यशस्वी पणे सांभाळत आहेत. जिल्ह्यातील नावाजलेली पतसंस्था म्हणून वैभवशाली पतसंस्थेचा उल्लेख केला जातो. सांबारी यांच्या चेअरमन पदी निवडीनंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वैभवशाली पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्रीकांत सांबारी यांची बिनविरोध निवड
