आंबोली, ता.०५: येथील कबुलायातदार गावकर जमीन संदर्भात १४ तारखेपर्यंत वन आणि महसूलचा अहवाल तयार न झाल्यास १५ तारखेला प्रांत कार्यालय येथे आंदोलन करण्यात येईल असे माऊली मंदिरातील बैठकीत ग्रामस्थांनी सांगितले.मंदिरात आमदार दीपक केसरकर यांच्या बैठकीत आज याबाबत चर्चा करण्यात आली. प्रांत कार्यालय येथे ८ तारीख च्या उपोषणावर ग्रामस्थांनी ठाम असल्याचे सांगितल्यानंतर आज ग्रामस्थांशी आमदार दीपक केसरकर यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली.
यावेळी प्रांताधिकारी पानवेकर,नायब तहसीलदार श्री.मुसळे,वनक्षेत्रपाल विद्या कोडगी, सरपंच गजानन पालेकर,उपसरपंच दत्तू नार्वेकर,सर्कल गुरुनाथ गुरव,तलाठी सुमित घाडीगावकर,शशिकांत गावडे,जगन्नाथ गावडे,मनोहर गावडे,श्रीकांत गावडे,बबन गावडे,राजेश गावडे,प्रकाश गावडे, बाळा गावडे,दुबा राऊत,दाजी गुरव,रत्नाकर फोंडेकर,भारतभूषण,उल्हास गावडे,सुनील नार्वेकर,उत्तम पारधी,विलास गावडे,रामा गावडे,लक्ष्मण गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी आमदार केसरकर यांच्याशी झालेल्या चर्चेवर केसरकर यांनी मुख्य मंत्री यांच्याकडे मीटिंग साठी वेळ मागितला आहे.हा प्रश्न धोरणात्मक असून मंत्रालय पातळीवर आहे. लवकरच बैठक घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे केसरकर यांनी सांगितले.यावेळी ग्रामस्थांनी ८ तरिखचे धरणे आंदोलन स्थगित करून अहवाल तयार न झाल्यास १५ तारीख ला आंदोलन करणार असल्याचे सरपंच गजानन पालेकर यांनी सांगितले.
