भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गतर्फे 8 मार्च रोजी महिला कामगार मोर्चा

कणकवली ता.०५-:* भारतीय मजदूर संघ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने भव्य दिव्य महिला कामगार मोर्चा मंगळवार 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त काढण्यात येणार आहे.

भारतीय मजदूर संघाच्या वतीने संपूर्ण देशभर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार महिलांच्या प्रश्नाबाबत विविध समस्या आणि अडचणीबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व जिल्ह्यामधे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व मोर्च्याद्वारे निवेदने सादर करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय मजदूर संघ जिल्हा सिंधुदुर्गच्यावतीने एस . टी . महामंडळ सध्या बंद असल्याने प्रवास करणे अडचनीचे आहे हे लक्षात घेवून 8 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजता पटकीदेवी मंदिर पासून पटवर्धन चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय कणकवली असे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. संपूर्ण जिल्ह्यातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार महिलानी मोर्चामधे ठरलेल्या वेळेत मोठ्या संघटित आणि असंघटित कामगारांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे .

जिल्ह्यातून हा महिला मोर्च्या आणि निवेदन सादरीकरणा साठी बहुसंख्यने महिला उपस्थित राहून लक्षवेधी करण्यास सहकार्य करतील अशी खात्री आहे . कृपया जिल्ह्यातील सर्व कामगार महिला भगिनींनी सहकार्य करावे असे नम्र आवाहन . भारतीय मजदूर संघ जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विकास गुरव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page