मनसे हिवाळे विभागीय अध्यक्षपदी सत्यवान घाडीगांवकर

मालवण ता.०५-:* मालवण तालुक्यातील हिवाळे विभागातील मनसे पदाधिकारी नियुक्ती मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यात मनसे हिवाळे विभागीय अध्यक्षपदी सत्यवान घाडीगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली. हिवाळे विभागातील काही ग्रामस्थांनी नुकताच मनसे पक्षात प्रवेश केला.

यावेळी हिवाळे विभागीय अध्यक्षपदी सत्यवान घाडीगांवकर, उपविभागीय अध्यक्षपदी पुरुषोत्तम गावकर यांची नियुक्ती परशुराम उपरकर यांनी जाहीर केली. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, सहसंपर्क अध्यक्ष मनोहर घाडीगांवकर, विनायक गावडे, संतोष सावंत, उदय गावडे, सचिन गावडे, अर्जुन वसंत गांवकर, सत्यवान तानाजी गांवकर, सत्यवान विश्राम घाडीगांवकर, पुरुषोत्तम जनार्दन गांवकर, राजेंद्र हिवाळेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page