खारेपाटण शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे शुभेच्छा समारंभ

कणकवली ता.०५-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ न म.विद्यालय व जुनियर कॉलेज खारेपाटण येथे इयत्ता बारावी शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे माजी राज्य उपाध्यक्ष शंकरराव कोकितकर उपस्थित होते.

तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भिकाजी कर्ले, तसेच मुख्याध्यापक प्रकाश अकिवाटे, पर्यवेक्षक संजय सानप, संचालक विजय देसाई, संचालक व सीनियर कॉलेज प्राचार्य आत्माराम कांबळे, संचालक राजेश वारंगे व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर प्रमुख पाहुणे शंकरराव कोकितकर यांनी आपल्या मनोगतामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना तान तणाव विरहीत परीक्षेला सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.

तसेच 12 वी नंतरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे, विजय देसाई, राजेश वारंगे, आत्माराम कांबळे, भिकाजी कर्ले, मुख्याध्यापक प्रकाश अकिवाटे, पर्यवेक्षक संजय सानप, ज्येष्ठ शिक्षक दयानंद कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. तर सहाय्यक शिक्षक अजय गुरसाळे यांनी बारावी ।परीक्षेसंदर्भात बोर्डाच्या सूचना दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सानप यांनी केले. तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक सचिन शेट्ये यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक नितीन वरूणकर यांनी केले.

You cannot copy content of this page