कणकवली ता.०५-:* कणकवली तालूक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या वतीने जागतीक महीला दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार 7 मार्च 2022 रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत मोफत डोळेतपासणी शिबिर ,रांगोळी स्पर्धा ,दुपारी 12 ते 1 पाककला पाककलेत महीलांनी घरूनच पदार्थ तयार करून आणायचे आहेत.
मंगळवार 8 मार्च रोजी सकाळी 9 ते 10 महीलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा ,11 वा. विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ ,11 ते 2 पर्यंत हळदीकुंकू समारंभ होवून कार्यक्रमांची सांगता होईल तरी त्वरीत स्पर्धेसाठी नाव नोंदणी करून स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन सरपंच पंढरी वायंगणकर ,उपसरपंच संतोष परब ,ग्रामसेवक आर.डी.सावंत व सर्व सदस्यांनी केले आहे.
