प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन

आंबोलीतील काबूलायतदार गावकार आक्रमक;सरकारला जागे करण्यासाठी ८ मार्चला धरणे आंदोलन करण्याचा दिला इशारा

सावंतवाडी ता.०५-:* आंबोलीतील कबुलायतदार गावकार जमिन प्रश्नी पुकारण्यात आलेल्या आंदोलना बाबत तोडगा काढण्यासाठी येथील मा. प्रांताधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकित विविध विषयावर चर्चा करण्यात आली चर्चेअंती वरिष्ठ स्थरावर पाठपुरवठा करू असे आश्वासन प्रांताधिकारयाकडून देण्यात आले. मात्र पदाधिकारी व अधिकारी यांनी गेली अनेक वर्षे दिलेली वाऱ्यावरील आश्वासने ऐकून 8 मार्च रोजी धरणे आंदोलन पुकारून सरकार व प्रशासनाचे कान व डोळे उघडणी करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी शशिकांत गावडे,श्रीकांत गावडे,गजानन पालेकर,उल्हास गावडे,सुनिल नार्वेकर,महादेव गावडे,प्रकाश गावडे,दत्तु नार्वेकर,विलास गावडे,राजेश गावडे,वामन पालेकर उपस्थित होते

You cannot copy content of this page