Headlines

इन्सुलीत एक्साइजची मोठी कारवाई

गोवा बनावटीच्या दारुसह ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

*⚡बांदा ता.०४-:* इन्सुली येथील उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी आज सायंकाळी उशिरा केलेल्या अवैध दारू वाहतुकीच्या कारवाईत ४१ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण ५० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र चालक फरार होण्यात यशस्वी झाला. गाडीतील कागदपत्रांवरुन चालक नामे दशरथ मीणा (रा. इंदोर, मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इन्सुली चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरु होती. गोव्यातून मध्यप्रदेशच्या दिशेने जाणार्‍या सहा चाकी वाहनाची तपासणी केली असता आतमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला. दरम्यानच्या काळात गाडीचा चालक फरार झाला.

गाडीमध्ये एकूण ५५२ बॉक्स (२७६०० बाटल्या) आढळून आल्या. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ४१ लाख ४० हजार रुपये आहे. दारु वाहतुकीसाठी वापरलेली ९ लाख ५० हजार रुपयांची गाडी असा एकूण ५० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी, उप अधीक्षक आर. ए. इंगळे, इन्सुली निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदिप रास्कर, कुडाळ निरीक्षक अमित पाडाळकर, कोल्हापूर पथकातील दुय्यम निरीक्षक के. डी. कोळी, ए. बी. पाटील, एस. बी. यादव यांच्या पथकाने केली. अधिक तपास संजय मोहिते करीत आहेत.

You cannot copy content of this page