मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची माहिती..
सावंतवाडी ता.०२-:* शहरात नगरपरिषद मार्फत घरपट्टी, पाणीपट्टी आणि स्वच्छता कर वसुली करण्यासाठी वसुली पथक नियुक्त करण्यात आले असून, शहरातील सर्व नागरिकांनी त्यांच्याकडे आपला घरपट्टी, पाणीपट्टी आणि स्वच्छता कर भरणा करावा असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे. यावेळी कर न भरणाऱ्या नागरिकांची मालमत्ता सिल करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
