कणकवली ता.०२-:* दङराजमुद्रा मेडिकल फाउंडेशन माळेगांव व कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त महाशिवरात्री निमित्त मोफत त्वचा , कुष्ठरोग व गुप्तरोग तपासणी शबिराचे आयोजन करण्यात आले होते यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे
नांदगाव तिठा येथील भगवती मेडिकल येथे हे शिबिर संपन्न झाले.सदर शिबिरासाठी डॉ . शिशिर खोसे पाटील हे तज्ञ डॉ लाभले होते . यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,असलदे सरपंच पंढरी वायंगणकर मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे डॉ .आकाश येडके व डॉ विनायक पारवे , नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे , भगवती मेडिकलचे सचिन हळदणकर,कमलेश पाटील, रविंद्र बोभाटे, गंगाधर बोभाटे , शैलेश टाकळे आदी उपस्थित होते.
