*⚡कणकवली ता.०२-:* मिळून साऱ्याजणी महिला मंच गेली अठरा वर्ष 8 मार्च हा जागतिक महिला दिन सातत्याने महिलांसाठी आनंदोत्सव म्हणून साजरा करत आलो आहोत. या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री मंगल कार्यालय येथे केले आहे. चार्मिंग लेडी स्पर्धे बरोबरच विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. 8 मार्च रोजी दुपारी 2.30ते 3.30,पाककला स्पर्धा. स्पर्धेतील पदार्थ आहे अस्सल मालवणी म्हणजेच कोकणी पदार्थ. शाकाहारी, मांसाहारी, गोड,तिखट असा कोणताही एकच पदार्थ घरी बनवून आणले. या पदार्थाची सजावट सुद्धा खाण्यायोग्य अशा मालवणी / कोकणी गोष्टींनी करणे . चार्मिंग लेडी स्पर्धा.. ही स्पर्धा फक्त विवाहित महिलांसाठी असून, स्पर्धेत भाग घेणार्या महिलांना आधी चार दिवस ट्रेनिंग दिले जाईल, भाग घेणाऱ्या महिलांना वयाची अ
थवा इतर कोणतीही अट नाही, मात्र अगोदर नोंदणी आवश्यक. समाजासाठी आणि कुटुंबासाठी विशेष असे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार.
उद्योगिनी पुरस्काराचे वितरण, महिलांचे विविध गुणदर्शनपर( रेकॉर्ड डान्स, मिमिक्री, एकपात्री अभिनय, कविता, महिलांसाठी संदेश पर भाषण, उस्फूर्त प्रतिसाद याद्वारे सादरीकरण अशा विविध मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल जागतिक महिला दिन 8 मार्च, मंगळवार, या दिवशी मातोश्री मंगल कार्यालय,कणकवली येथे दुपारी 2 वाजल्यापासून असणार आहे. महिलांनी महिलांसाठी उभ्या केलेल्या व्यासपीठाला आपण सर्व महिला भगिनी उपस्थित राहून आमचा उत्साह आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी नम्रतापूर्वक विनंती मिळून साऱ्याजणी यांच्यावतीने करण्यात येत आहे.
