शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान महत्वपूर्ण: प्रा. डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

कणकवली ता.०२-:* विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीच्या जोरावर मानवी जीवन सोयी-सुविधांनी परिपूर्ण झाले आहे. प्रत्येकाने स्वत:मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन दृढ करून शाश्वत विकासासाठी निसर्ग आणि आपल्या गरजा यामध्ये समतोल साधता आला पाहिजे.

विज्ञान फक्त शाळा, महाविद्यालये आणि पुस्तकांमध्ये मर्यादित न राहता, ते तळागळातील लोकांपर्यंत पोहोचण्या करिता संशोधक आणि विज्ञान क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या विश्वस्त आणि शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रोफेसर डॉ. राजश्री साळुंखे यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज, कणकवली विज्ञान मंडळ व आई. क्यू. ए. सी. यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित “राष्ट्रीय विज्ञान दिन” कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे अध्यक्ष भाईसाहेब खोत, प्राचार्य डॉ राजेंद्रकुमार चौगुले, प्रा. डॉ. बाळकृष्‍ण गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई खोत मार्गदर्शन करताना म्हणाले की, विज्ञानाचा वापर लोकांनी समाज विकासासाठी करावा. विज्ञान आणि संशोधनातून संकटात आणि दु:खात असणार्‍या लोकांना मदत करायला हवी. आरोग्य संतुलन व्यवस्तीत राहील अशी आपली कार्य पद्धती पर्यावरण पूरक असणे आवश्यक आहे. विज्ञान कालानुरूप बदलत आहे आपले ज्ञान अद्ययावत करत रहा असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुमार चौगुले म्हणाले की सध्या शाश्वत विकासाची आवश्यकता आहे. विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाची हानी करत आहोत विकास हा शाश्वत हवा त्यासाठी सर्वांनी पर्यावरण स्नेही जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे.

यावर्षीचा राष्ट्रीय विज्ञान दिन “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टिकोन” या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून करण्यात आली. राष्ट्रीय विज्ञान दिन अंतर्गत प्रश्नमंजूषा स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, पावर पॉइंट प्रेझेंटेशन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चिन्मय लोके, द्वितीय क्रमांक साक्षी चव्हाण, तृतीय क्रमांक आकांक्षा कदम. पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साहिल पडवळ, द्वितीय क्रमांक आकांक्षा कदम, तृतीय क्रमांक सार्थक ठकराल पावर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये प्रथम क्रमांक सागर कदम, द्वितीय क्रमांक हर्षदा कुबल, तृतीय क्रमांक सर्वेश सावंत. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वैभवी महाडेश्वर, द्वितीय क्रमांक रश्मी मालाडकर, तृतीय क्रमांक रिद्धी मोरये.

निबंध लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सिद्धी पालव, द्वितीय क्रमांक सायली कदम, तृतीय क्रमांक सानिका कासले. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आकांक्षा कदम आणि भाग्यश्री कुंभार द्वितीय क्रमांक सायली तांबे आणि वैभवी चव्हाण, तृतीय क्रमांक ऐश्वर्या कदम आणि ऋतुजा कोदे कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु. हर्षदा कुबल, प्रा. सुरेश पाटील प्रा. डॉ. शामराव दिसले यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त प्रास्ताविक व मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजना मध्ये प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे, प्रा. स्वप्निल कदम, प्रा. विनय डुबले, प्रा. अपूर्वा गोलतकर, प्रा. स्नेहल जाधव, प्रा. अरविंद उमरीकर, प्रा. सुप्रिया जोशी, प्रा. अवधूत पुरोहित, प्रा. हर्षदा मालंडकर, प्रा. मेलसगरे , प्रा. मांजरेकर, प्रा. रहाटे, प्रा. पल्लवी गोखले आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता म्हापसेकर, दिशा पटेल, सिद्धी राणे व ऐश्वर्या कदम, यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी प्रा. गीतांजली नार्वेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी १८० विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page