आरोग्य शिबिरासोबतच मोफत शस्त्रक्रिया देखील होणार:समीर नलावडे
कणकवली ता.०२-:* कणकवली शहरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पदर प्रतिष्ठाणची स्थापना करण्यात आली आहे.या प्रतिष्टानच्या माध्यमातून आरोग्य, शैक्षणिक,कला,क्रीडा,उद्योग विषय उपक्रम आगामी काळात राबवलीले जाणार आहेत.जागतील महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्चला सायंकाळी 5 वा.या प्रतिष्ठनचा ओपनिंग सोहळा विद्यामंदिरच्या पटांगणावर होणार आहे.
या सोहळ्याला नीलम राणे,नंदिता राणे यांची प्रमुख उपस्थितीती रहाणार आहे.प्रतिष्ठानच्या ओपनिंग सोहळ्या निमित्त कणकवली शहरातील महिलांसाठी आरोग्य शिबीर व होम मिनिस्टर स्पर्धा आयोजीत केल्याची माहिती पदर प्रतिष्ठाचे संस्थापक तथा कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कणकवली नगरपंचायत येथे आयोजित पत्रकार परिषदेत यावेळी नगरसेविका मेघा गांगण,सुप्रिया नलावडे,हर्षाली गवाणकर,संजीवनी पवार,दिशा अंधारी,दिशा अंधारी,प्रियाली कोदे,अंकिता कर्पे,वर्षा बांदेकर,साक्षी वाळके,विनिता राणे,दिव्या राणे आदी महिला उपस्थित होते.
पदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.या प्रतिष्ठानमध्ये 300 महिला सभासद आहेत.ही संख्या 1000 पर्यंत नेण्याचा मानस आहे.पदर प्रतिष्ठानच्या सभासदांना विमा सवरक्षण दिले जनार असुन पदर प्रतिष्ठानचे आय कार्ड दिले जाणार आहे. प्रतिष्ठानचा उदघाटन सोहळा 8 मार्च रोजी विद्यामंदिरच्या पटांगणावर सायंकाळी 5 वा दिमाखदार स्वरूपात पार पडणार आहे. प्रतिष्ठानचे उद्घाटन नीलम राणे यांच्या हस्ते व नंदिता राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे उद्घाटन सोहळ्या निमित्त होम मिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या या स्पर्धेतिल प्रथम विजेत्या महिलेला फ्रीज,द्वितीय वॉशिंग मशीन,तृतीय कुलर, चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी अनुक्रमे मिक्सर असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तर उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ द्वारे 25 महिलांना भेटवस्तू दिली जाणार आहे.
दरम्यान सकाळच्या सत्रात प्रतिष्ठान व एस एस पी एम मेडिकल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात सकाळी 9 वा ते 5 वा पर्यंत होणार आहे.या शिबिरात तज्ञ डॉक्टर सहभागी होऊन महिलांच्या आरोग्याची आरोग्य तपासणी करणार आहेत.यामध्ये कॅन्सर टेस्ट सह जर्नल तपासणी केली जाणार आहे या शिबिरात वय वर्ष 20 ते 70 वयोगटातील या महिलांना सहभाग घेता येईल या शिबिरात उपचारासोबतच मोफत शस्त्रक्रिया पदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जाणार आहेत. या शिबीराचा तसेच पदर प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समीर नलावडे यांनी केले आहे.
पदर प्रतिष्टानची कार्यकारणी जाहीर अध्यक्षा – मेघा गागंण,उपाध्यक्षा – हर्षदा गवाणकर,सचिव – मीरा कवडे,खजिनदार – सुप्रिया नलावडे,सदस्य – दिशा अंधारी, साक्षी वाळके,प्रियाली कोदे,अंकिता कर्पे,दीक्षा राणे सल्लागार पदी- कविता राणे,प्रतीक्षा सावंत,मेघा सावंत,वर्षा बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे.
