चिंचवली गावचे माजी सरपंच आदर्श शेतकरी मनोहर पेडणेकर यांचे निधन

कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील चिंचवली या गावचे रहिवाशी तथा गावचे माजी सरपंच व सिंधुदुर्ग जिल्ह्यतील आदर्श शेतकरी मनोहर बाबु पेडणेकर उर्फ “नाना’ यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांच्या मूळ घरी चिंचवली येथे दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र समजताच राजकीय,सामाजिक व सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

चिंचवली गावचे विद्यमान उपसरपंच अनिल पेडणेकर यांचे ते वडील होत. चिंचवलीसह सम्पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक आदर्श शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे ” नाना ” यांनी चिंचवली गावात हरित क्रांती घडवून कृषी क्षेत्रात चिंचवली गावाला महाराष्ट्राच्या नकाशावर झळकावले आहे.आपल्या संयमी व प्रेमळ स्वभावाने तसेच कार्यकर्तृत्वाने त्यांनी अनेक लोकांमध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले सुने नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page