भूतनाथ देवस्थान आयोजित जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेत श्री समर्थ प्रसादिक भजन मंडळ प्रथम

मालवण ता.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानाच्या समजल्या जाणाऱ्या श्री देव भूतनाथ देवस्थान आयोजित जिल्हा स्तरीय संगीत भजन स्पर्धेमध्ये श्री समर्थ प्रासादिक भजन मंडळ कट्टा, बुवा संकेत मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, प्राथमिक शिक्षक कला मंच प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ, बुवा राजेश गुरव यांनी द्वितीय, तर ओम् आदिनाथ सिध्द महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, कणकवली बुवा दिव्या गोसावी यांना तृतीय क्रमांक मिळाला.

वायरी भूतनाथ येथील श्री देव भूतनाथ देवस्थान तर्फे सोमवारी व मंगळवारी महाशिवरात्रीचे औचित्य साधून जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम दिवशी निकाल जाहीर करण्यात आला. यानुसार प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५००० रुपये (संदीप बोडवे पुरस्कृत) व चषक, ४००० रुपये (साई माऊली व औदुंबर रिसॉर्ट पुरस्कृत) व चषक, ३००० रुपये (स्वरूप तळगावकर पुरस्कृत) व चषक अशी पारितोषिके देण्यात आली. श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ नेरूर, बुवा भार्गव गावडे, श्री गिरोबा प्रासादिक भजन मंडळ बिबवणे, बुवा कुणाल शिरोडकर, श्री देवी प्रासादिक भजन मंडळ भोगवे बुवा मदन करलकर, यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम तीन साठी रोख रक्कम व आकर्षक चषक अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेमध्ये वैयक्तीक विभागातून उत्कृष्ठ गायक : नरेंद्र मेस्त्री (दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे कुडाळ), उत्कृष्ठ पखवाज: दीपक मेस्त्री (शिक्षक कला मंच), उत्कृष्ठ तबला: राजाराम परुळेकर (श्री देवी प्रासादिक भजन मंडळ), उत्कृष्ठ हार्मोनियम : भार्गव गावडे (मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ), उत्कृष्ठ झांज : ललित कोळंबकर (देवी प्रासादिक भजन मंडळ), उत्कृष्ठ कोरस : समर्थ प्रासादिक भजन मंडळ कट्टा, उदयोन्मुख भजनी बुवा : यश कुडाळकर (स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ) व दिव्या गोसावी (आदिनाथ सिध्द महापुरुष प्रासादिक भजन मंडळ) यांनी पारितोषिके पटकावली. स्पर्धेला पंच म्हणून हेमंत प्रभू मालवण, आणी सचिन पालव वेंगुर्ला यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा परिषद सदस्य, हरी खोबरेकर, सिंधुरत्न भजन बुवा भालचंद्र केळुस्कर, मातृत्व आधार फाउंडेशन चे संतोष लुडबे, आप्पा चव्हाण, दादा वेंगुर्लेकर, कृष्णा देऊलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर, नाना नाईक यांनी पाहिले.

यावेळी देवस्थानचे मोहन बोडवे, भालचंद्र बोडवे, सुरेश बोडवे, रामचंद्र बोडवे, लक्ष्मण बोडवे, संदीप बोडवे, किरण बोडवे, गजानन बोडवे, मंदार बोडवे, संकेत बोडवे, चैतन्य बोडवे, प्रथमेश बोडवे, महेश तळवडेकर, भालचंद्र गावकर, प्रकाश पेंडूरकर आदी उपस्थित होते. यावेळी मातृत्व आधार फाउंडेशन तर्फे सागरी पर्यावरण विषयक पत्रकारितेसाठी पत्रकार संदीप बोडवे यांचा तर कोविड योद्धा म्हणून गजनन बोडवे, मंदार बोडवे यांचा सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page