जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण माकडतापचा नाही

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ कर्तस्कर यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता ०२ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितित (के एफ डी) माकड़तापाचा एकही रूग्ण नाही.मात्र खबरदारीच्या उपाय योजना करण्यासाठी हिवताप विभाग सतर्क करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी रमेश कर्तस्कर यांनी आज दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर एकही मकड़ताप रूग्ण आढळलेला नाही. हिवतापाची साथ जिल्ह्यात आटोक्यात आली आहे. मात्र आता जिल्ह्यात काजू पिकाचा हंगाम सुरु झाला आहे.

माकड़ तापाची साथ उदभवण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा हिवताप विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. माकड़तापाची साथ उदभवण्याची शक्यता असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील बांदा, मोरगांव, तळकट, सटेली-भेडसी या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गांवामध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात (डी एम पी )ऑइल, तसेच म्यलीथॉन पावडरचा मुबलक पुरवठा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही माकड़ तापाचा रूग्ण नाही.

मात्र ही साथ येऊ नये. यासाठी उपाययोजना करतानाच रुग्णाचा शोध घेण्यासाठी सर्वे सुरु करण्यात आला आहे. तर संशयित रुग्णाचे सीरम सैम्पल दर गुरुवारी तपसणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येतात . २४ फेब्रुवारी (गुरुवारी) सशयित ९ रुग्णांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यामध्ये एकही नमूना के एफ डी पॉझिटिव सापडलेला नाही. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तस्कर यांनी आज दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूच्या हंगामात माकड़ तापाची साथ उद्भवते. हे लक्षात घेता

माकड़तापाची साथ येऊ नये. यासाठी हिवताप विभाग सतर्क झाला असला तरी प्रत्येक नागरिकांनी माकडतापा बाबत ख़बरदारी घेतली पाहिजे. काजू बागेत किव्हा जंगल भागात जाताना आरोग्य यंत्रने कडून दिलेल्या सूचनाचे पालन करावे. तसेच साथरोग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांसाठी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तस्कर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page