७ पासून अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे आंदोलन

जनरल सेक्रेटरी कमलताई परुळेकर यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता ०२-: नवीन मोबाईल, किमान वेतन आणि पेन्शन आदींसाठी राज्य शासनाने आता होणाऱ्या अधिवेशनात तरतूद करावी. याकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने ७ ते १० मार्च या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांनी दिली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, पेन्शन मिळावी, अंगणवाडी साहित्य अंगणवाडी पर्यंत पोच व्हावे, रजिस्टर साठी निधी द्यावा, आदिवासी भागात जादा मानधन द्यावे, मिनी अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मिळावी, १५ मार्च पासून अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात यावे, आदी विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतिने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी आझाद मैदानावर आंदोलन केले होते.

यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी संघटना प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी अंगणवाडी साहित्य अंगणवाडी पर्यंत पोच व्हावे, रजिस्टर साठी निधी द्यावा, आदिवासी भागात जादा मानधन द्यावे, मिनी अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मिळावी, १५ मार्च पासून अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात यावे आदी विविध मागण्या मान्य करण्यात आल्याने २५,२६ फेब्रुवारीच्या धरणे आंदोलन रद्द करण्यात आले. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईलसाठी १० हजार रुपये मिळावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे तसेच पगाराच्या निम्मे रक्कम पेन्शन स्वरूपात मिळावी या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. आणि यासाठी राज्यशासनाने आता होणाऱ्या अधिवेशनात निधीची तरतूद करावी.

याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने ७ ते १० मार्च या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांनी आज दिली.

You cannot copy content of this page