एकदा राज ठाकरे यांना संधी देऊन पहा

माजी आमदार परशुराम उपरकर : आरोस शाखेतर्फे मराठी भाषा दिन साजरा

बांदा ता.०२-:* सिंधुदुर्गसह राज्यातील राज्यकर्त्यांनी काय दिवे लावलेत ते आपण बघतात. त्यामुळे एकदा राज ठाकरे यांना संधी देऊन पहा, आपला विकासात्मक विश्वास आम्ही संपादन करू. सिंधुदुर्गातील असो वा महाराष्ट्रातील विकासकामांवर डल्ला मारून जे स्वतःचे खिसे भरतात त्यांच्यावर खऱ्याअर्थाने लक्ष ठेवून रोखणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे पाठिंबा देईल, असे वचन महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले. यावेळी अनेक तरूणांनी मनसेत प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडीच्यावतीने आरोस शाखेतर्फे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.

यावेळी माजी आमदार उपरकर बोलत होते. आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक व नंदु परब यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा सचिव बाळा पावसकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, माजी तालुका संपर्क अध्यक्ष महेश परब, कुडाळ सचिव राजेश टंगसाळी, धाकोरे शाखाध्यक्ष निलेश मुळीक, तिरोडा शाखाध्यक्ष संदेश शेट्ये, पिंगुळे शाखाध्यक्ष वैभव धुरी, कळणे विभाग अध्यक्ष अभय देसाई, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, पोलिस पाटील महेश आरोसकर, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, तळवणे उपसरपंच आबा बर्डे, आरोस माजी सरपंच केशव नाईक, तसेच अण्णा आरोसकर, सुरज पटेकर, नीरज नाईक, अनिल सावंत, मुकुंद धारगळकर, संतोष सावंत, बदलापूरचे मनसे सैनिक तुषार गावडे, तनिष्का गावडे, बंड्या आरोसकर, प्रवीण आरोसकर, गौरेश नाईक, सागर पटेकर, अजित कासले आदी ग्रामस्थ, पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

कोरोना कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.उमेश डेगवेकर, आरोग्यसेवक बी.डी.राठोड, आरोग्यसेविका एस.एस.मोरजकर, अंगणवाडी सेविका प्राची मेस्त्री, अंजली नाईक, पुजा परब, आशासेविका संजना कोरगावकर, राजश्री मोरजकर, पोलिस पाटील महेश आरोसकर, वायरमन मंदार दाभोलकर, पत्रकार मदन मुरकर, डॉ.नमिता धुरी, समिता तावडे यांचा कोरोना योद्ध्यांचा मनसेतर्फे सन्मान करण्यात आला. तर सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त विश्वनाथ नाईक आणि राज्यस्तरीत कविचा वाचन स्पर्धेत राज्यात प्रथम आलेली श्री गिरोबा विद्यालय आरोसमधील विद्यार्थिनी अन्वी मुकुंद धारगळकर हिचा सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page