हिस्ट्री क्लब मठ हायस्कुलचे आयोजन
वेंगुर्ला प्रतिनिधी– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गेली पाच वर्षे शिवाजी ट्रेल पुणे या संस्थेच्या अंतर्गत हिस्ट्री क्लब मठ हायस्कूलच्यावतीने दुर्गपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी हिस्ट्री क्लबच्या वतीने निवती किल्ला येथे क्लबच्या प्रमुख दिपिका परुळेकर हिच्या हस्ते दुर्गपूजन करण्यात आले.
यावेळी उपप्रमुख प्रणव सकपाळ, मठ हायस्कूल मुख्याध्यापक एस.ए.जाधव, कर्मचारी दिगंबर मोबारकर, सदस्य प्रबोध जाधव, ओंकार परुळेकर, गौरव मेस्त्री, रोशन गावडे, मधुरा परब, ज्ञानेश्वर परब, सुयश मठकर, रसिका ठाकुर, राघोबा गावडे, अनिकेत जाधव, पुंडलिक धुरी, तनय नाईक, पूर्वा शेडगे, मयुरेश मांजरेकर उपस्थित होते.
