वेतोरे श्री देवी सातेरी वाचनालयाला ४०० पुस्तकांची देणगी

जेष्ठ लेखिका वैजयंती करंदीकर यांचा पुढाकार

वेंगुर्ला ता.०२-:* कणकवली येथील ज्येष्ठ लेखिका वैजयंती करंदीकर यांनी वेतोरे येथील श्री देवी सातेरी सार्वजनिक वाचनालयाला सुमारे ४०० पुस्तके देणगीदाखल दिली आहेत. आधुनिक विज्ञानाच्या काळात इलेक्ट्राॅनिक्स मिडियाचे प्रस्थ असताना आपले ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपणारे साहित्य अनेक वर्षे ही वाचनालये जतन करत आहेत.

अनेक विद्यार्थी व वाचकांना संदर्भग्रंथ उपलब्ध करून शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे सहाय्य करत आहेत. साहित्य सहज उपलब्ध करून देणारी अशी वाचनालये सुस्थितीत सुरू राहणे हे आवश्यक आहे. भंजाळलेल्या मानसिकतेत सांस्कृतिक ठेवा व वाचनसंस्कृती जपणारी ही मंदिरे उभी राहणे आवश्यक असल्याचे मत करंदीकर यांनी व्यक्त केले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष विवेक गोगटे व सामाजिक कार्यकर्ते संदीप गोगटे.उपस्थित होते.

You cannot copy content of this page