दर्शन, लक्ष्मण “खर्डेकर श्री” चे मानकरी…

वेंगुर्ला ता.०२-:* बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्यावतीने सातेरी व्यायामशाळा येथे युवा महोत्सवानिमित्त कै. काकासाहेब चमणकर स्मृतिप्रित्यर्थ जगदीश चमणकर पुरस्कृत व किशोर सोनसुरकर सातेरी व्यायामशाळा मार्गदर्शित आंतरवर्गीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सिनियर गटात दर्शन गडेकर तर ज्युनिअर गटात लक्ष्मण दळवी यांनी ‘खर्डेकर श्री‘ किताब पटकाविला.

स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेंद्र खामकर, सतिश डुगळे, अभिषेक चमणकर, प्राचार्य विलाय देऊलकर, सुरेंद्र चव्हाण, ऐश्वर्य चमणकर, किशोर सोनसुरकर, प्रा.डी.जे.शितोळे, प्रा.देविदास आरोलकर, अबोली सोनसुरकर, प्रा.संजय चमणकर, प्रा.विरेंद्र देसाई, प्रा.कमलेश कांबळे, प्रा.हेमंत गावडे, प्रा.जे.वाय.नाईक आदी उपस्थित होते.

सिनियर गटामध्ये दर्शन गडेकर-प्रथम (खर्डेकर श्री), श्रीराम गावडे-द्वितीय, अभिषेक गावडे-तृतीय, ज्युनिअर गटामध्ये लक्ष्मण दळवी-प्रथम (खर्डेकर श्री), साहिल बागायतकर-द्वितीय, ओम पवार-तृतीय यांनी क्रमांक पटकाविले. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पंच म्हणून सुधीर हळदणकर, अमोल तांडेल, हेमंत नाईक, विनय घुरत, संतोष कीर, हेमंत चव्हाण यांनी काम पाहिले. या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशनचे सहकार्य लाभले. प्रा.कमलेश कांबळे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page