तातडीने योग्य कारवाई करावी : माजी नगरसेवक आनंद नेवगी यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
सावंतवाडी ता.०२-:* शहरातील उभाबाजार, जुना बाजार, माठेवाडा, वैश्यवाडा तसेच बाजारपेठ परिसरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून, या भागातील झाडे, फुले वाळत घातलेल्या वस्तूंचे नुकसान करत आहेत. तसेच बाजारपेठेत देखील भाजीपाला, कांदे बटाटे यासारख्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यांच्यावर तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
यावेळी त्यांनी आम्ही सत्तेवर असताना सबंधित जनावराच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. अशी माहिती देखील दिली आहे.
