दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब लागल्या रांगा..
देवगड ता.०१-:* तालुक्यातील दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.रात्रौ १२ वाजलेपासून मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या दर्शन रांग मंडपात लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मागील दोन वर्षातील कोरोनाचे संक्रमण तिसऱ्या टप्प्यात कमी होऊन निर्बंध शिथिल झाल्याने भाविक भक्तगण उत्साहात दर्शनासाठी उपस्थित होते .
दर्शनाकरिता सुयोग्य नियोजन दर्शन रांगा मधून करण्यात आले आहे.श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ,ग्रामस्थ, यांच्या सह महसूल,पोलीस पोलीस प्रशासन,ग्रामपंचायत यांच्या सर्वांच्या सहकार्याने दि.१मार्च रात्री १२ वाजलेनंतर देवस्थान पुजारी गुरव,ग्रामोपाध्ये तसेच मानकरी देवस्थान ट्रस्ट यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. या नंतर एम .के.घारे ज्वेलर्सचे उदय घारे, माजी पालकमंत्री आम.दीपक केसरकर,आम.वैभव नाईक,अतुल रावराणे,संदेश पारकर,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने,तहसीलदार मारुती कांबळे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण ,स्नेहल जाधव,सौ भोईर,यांनी श्री देव कुणकेश्वराची पूजा करून दर्शन घेतले,।या वेळी नगरसेवक सुशांत नाईक देवगड जामसंडे नगराध्यक्षा साक्षी प्रभू,नगरसेवक विशाल मांजरेकर,निवृत्ती तारी, गणेश गावकर गणेश वाळके अमोल लोके यांनीही दर्शन घेतले.
मान्यवरांच्या उपस्थितीत आरती झालेवर मंदिर भाविक भक्त गणना दर्शनाकरिता खुले करण्यात आले. महसूल प्रशासन,पंचायत समिती,यांचे मार्गदर्शन कक्ष,स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय यात्रा उत्सव काळात कार्यरत असून कायदा सुव्यवस्था राखणेकरिता जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नियंत्रण कक्ष कायमस्वरूपीं कार्यरत ठेवण्यात आला आहे.दि.२मार्च रोजी अमावास्या असल्याने या दिवशी पहाटे पासून भाविकांना देवस्वारी सोबत समुद्र स्नानाचा योग जुळून आला आहे. यात्रा उत्सवात आरोग्य विभाग,वीज विज वितरण कंपनी,बीएसएनएल ,आपत्ती निवारण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत.विविध खाद्य पदार्थ,कपडे,खेळणी,भांडी हॉटेल खाजा स्वीट मार्ट अन्य साहित्य या दुकानांची गर्दी जाणवत आहे या वर्षी देवस्वारी मध्ये प्रामुख्याने,श्री जैन भरतेश्वर देवस्वारी मसुरे ,श्री देवी पावणाई देव रवळनाथ मालवण यांचा समावेश असून देवस्वारी सोबत स्नानाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
