जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्याकडे मागणी
सावंतवाडी ता.०२-: कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे तसेच या रुग्णालयात शासकीय निकषानुसार सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि तेथे तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
