अपर्णा कोठावळे यांच्या प्रयत्नाने मंगळवारी रात्री सावंतवाडीतील आपल्या घरी झाला दाखल : आईवडिलांनी टाकला सुटकेचा निश्वास
सावंतवाडी ता.०१-:* युक्रेन रशिया युद्धात युक्रेन देशातील आयव्होनो फ्रॅन्कीव्हस्क या शहरात अडकलेला सावंतवाडीतील सोमेश नागेंद्र टक्केकर हा युवक अखेर मंगळवारी रात्री सावंतवाडी येथे आपल्या घरी दाखल झाला. त्याला सुखरुप पाहून आईवडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला.सोमेश नागेंद्र टक्केकर हा विद्यार्थी युक्रेनमध्ये आयव्होनो फ्रॅन्कीव्हस्क नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी युक्रेन येथे एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता. तेथील युद्धाच्या परिस्थितीमुळे त्यांच्या आई-वडिलांचा जिव टांगणीला लागला होता. त्याला भारतात सुखरुप आणण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडे मदत करण्याची विनंती केली होती.
येथील शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे यांनीही खासदारा मार्फत यासाठी प्रयत्न केले होते. तो राहत असलेल्या शहरातून रोमानिया देशात जात तेथून विमानाने सोमवारी तो विमानाने दिल्ली येथे आला होता. मंगळवारी सायंकाळी तो गोवा वास्को विमानतळावर पोहोचल्यावर त्याच्या आईवडिलांचा जीव मुठीत पडला. सर्वांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा मुलगा सुखरूप देशात आल्याची भावना त्याच्या आईवडिलांनी व्यक्त केली तर सोमेश यांनी भारत सरकार आणि मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
