कर्तृत्व नसल्यानेच दीपक केसरकर यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद नाकारले

माजी खासदार निलेश राणे : सावंतवाडी मतदारसंघ पूर्वीपासूनच राणेंचे होम पीच

सावंतवाडी ता..०१-: सावंतवाडी हे पूर्वीपासूनच राणेंचे होम पीच असून, या तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत वर राणेंचीच सत्ता होती. त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांना आम्ही सावंतवाडी तालुक्यात कधीच शह दिला आहे. त्यांची किंमत आता शिवसेना देखील करत नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्री पद देखील नाकारले असल्याचा जोरदार टोला माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आपण निवडणूक १०० टक्के लढवणार आहे. परंतु, खासदारकी लढवणार की आमदारकी हे अद्याप आपणाला देखील माहित नाही. पक्ष जी निवडणूक लढवण्याचा आदेश आपणाला देईल ती निवडणूक मी लढवणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी सावंतवाडीत मात्र आमदारकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यात येणार असून, त्याचे नाव वेळ आल्यावर जाहीर करू, असे देखील सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी ही बोगस आघाडी असून, त्यांचे दोन आमदार, एक खासदार आणि पालकमंत्री असून देखील नगरपालिका निवडणुकीत भाजप जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. असे ते बोलताना म्हणाले. यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, समृध्दी विर्नोडकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, बंटी पुरोहित,

You cannot copy content of this page