बांदा : प्रतिनिधी बांदा-बळवंतनगर येथून २५ फेब्रुवारीपासून बेपत्ता झालेला युवक साईप्रसाद प्रदीप बांदेकर (वय २६) पणजी-गोवा येथे सापडला आहे. गोव्यात नोकरीनिमित्त असलेले बांद्यातील युवक दिनेश नाईक व रमीज शेख यांना हा युवक आज दुपारी सापडला.
२५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घरातून फिरायला बाहेर जातो असे सांगून गेला तो अद्याप घरी परताला नसल्याची तक्रार वडील प्रदीप बांदेकर यांनी बांदा पोलिसात दिली होती. त्यानंतर या युवकाची शोधाशोध सुरू होती. आज दुपारी दोन्ही युवकांना साईप्रसाद बांदेकर सापडला. त्यांनी याची कल्पना बांदा सरपंच अक्रम खान यांना दिली. युवकाला ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक गोव्यात रवाना झाले आहेत. नाईक व शेख या दोन्ही युवकांच्या समयसुचकतेचे सरपंच खान यांनी कौतुक केले आहे.
