वेंगुर्ला ता.२८-:* वेंगुर्ला भाजपाच्यावतीने शिरोडा येथील गुरुवर्य अ.वि.बावडेकर विद्यालयात मराठी राज्यभाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमात अजित राऊळ व मनोहर होडावडेकर यांनी आपले विचार मांडले. तर पी.के.कुबल, सुरेखा देशपांडे, स्वप्निल वेंगुर्लेकर, विशाल उगवेकर यांनी कविता सादर केल्या. तसेच भाजपाच्यावतीने पी.एस.कौलापूरे यांच्या हस्ते वृंदा कांबळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळ भाजपाच्या प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, दादा केळुसकर, लक्ष्मीकांत कर्पे, संतोष अणसूरकर, सुरेश म्हाकले, सोमकांत सावंत, आरवली सरपंच तातोबा कुडव, शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, ग्रामपंचायत सदस्य समृद्धी धानजी यांच्यासह अन्य उपस्थित होते. शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी स्वागत, एस.एल.कदम यांनी सूत्रसंचालन तर श्रीकृष्ण धानजी यांनी आभार मानले.
