वेंगुर्ला ता.२८-:* शिवजयंती औचित्य साधून श्री देवी सातेरी वाचनालय व गुरू माऊली माई मांजरेकर ग्रंथसंग्रहालय वजराट यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या गावस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात कर्तव्य बांदिवडेकर तर मोठ्या गटात साक्षी दळवी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
पहिली ते चौथी या लहान गटात २१ तर पाचवी ते सातवी या मोठ्या गटात १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लहान गटात प्रथम-कर्तव्य तेजस बांदिवडेकर, द्वितीय-संजिता गजानन वेंगुर्लेकर, तृतीय-वेदिका जयंत वजराटकर, उत्तेजनार्थ-स्वप्निल संजय मेस्त्री व नीरज शेखर परब यांनी तर मोठ्या गटात प्रथम-साक्षी मोहन दळवी, द्वितीय-सृष्टी उमेश पालयेकर, तृतीय-आर्यन विकास मुंजी, उत्तेजनार्थ-लावण्या जयवंत राणे आदींनी यश प्राप्त केले. स्पर्धेचे परिक्षण शिक्षिका वसुंधरा सुर्वे यांनी केले.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती सुचिता वजराटकर, श्री देवी सातेरी वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दळवी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रमानंद सावंत-भोसले, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष शेखर परब, वजराट गावातील शाळांमधील मुख्याध्यापक परब, सावंत, पराडे तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तेजस बांदिवडेकर, खरात, पाटील, नितीन सावंत तसेच ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. वजराट शाळा नं.१चा विद्यार्थी विश्वजित पेंडसे याने सूत्रसंचालन केले. विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
